कणकवलीत आदेश बांदेकर यांच्यासोबत रंगणार ‘खेळ पैठणीचा’

0
130

कणकवली : ‘दार उघड बये दार उघड’ असे म्हणत महिलांच्या गळ्यातील ताईत बनलेले अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्यासोबत कणकवली वासीय महिलांना पैठणीचा खेळ खेळण्याची नामी संधी मिळणार आहे. कणकवली शहर शिवसेनेच्या आयोजनातून आदेश बांदेकर कणकवलीच्या विद्यामंदिर हायस्कुलच्या पटांगणावर खेळ मांडीयेला… महा पैठणीचा या खेळाद्वारे ३ पैठणींसह हमखास बक्षिसे जिंकण्याची संधी कणकवलीतील महिलांना उपलब्ध करून देणार आहेत. अवघ्या महाराष्ट्र्रातील महिला उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडीयेला ..महापैठणीचा या खेळात सहभागी होऊन एक दोन नव्हे तर तब्बल ३ पैठण्या जिंकण्याची सुवर्णसंधी कणकवली वासीय महिलांना मिळणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी विद्यामंदिर हायस्कुलच्या पटांगणावर सायंकाळी साडेपाच वाजता खेळाला सुरुवात होणार आहे.पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उदघाटन होणार असल्याची माहिती नगरसेवक सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. होमिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्या सोबत पैठणीचा खेळ खेळण्याची दुर्मिळ संधी कंकवलीतील महिलांना शहर शिवसेनेमुळे उपलब्ध झाली आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबातील महिलांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महिला शिवसेना आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here