चिंतामनी पवार या शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करा;सदस्य मंगेश लोके यांची मागणी

0
127
वैभववाडी : शिक्षकी पेक्षाला कलंक लावणारा चिंतामणी पवार याच केवळ निलंबन नको तर त्याला सेवेतून बडतर्फ करा.अशी मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली. वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत लोरे परिसरातील प्राथमिक शिक्षक चिंतामणी पवार यांच्यावर केवळ निलंबन कारवाई नको तर त्याला  बडतर्फ करण्यात याव. सदर शिक्षकाने आतापर्यंत इतर तालुक्यात केलेल्या सेवेच्या ठिकाणची माहीती घ्यावी. त्या शिक्षकावर कारवाई झाली तर यातून इतरांना दहशत बसेल. त्यामुळे शिक्षकावर केवळ निलंबनाची कारवाई न करता बडतर्फ कराव अशी मागणी लोके यांनी केली.पाणी पुरवठ्याची कामे मार्चपुर्वी पुर्ण करावीत. पाणी टंचाईची वेळ येऊ नये. अर्धवट स्थीतीत काम असणाऱ्या ठेकेदारांना समज देऊन कामे पुर्ण करावित. असा आदेश सभापती यांनी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिला. तालुक्यातील डिजीटल शाळाबाबत शिक्षण विभागाने सर्व्हे कराव. अशी मागणी अरविंद रावराणे यांनी केली. शिक्षण विभागाने दिलेल्या चुकीच्या माहीतीमुळे तालुक्यातील शाळा डिजीटल होण्यापासून वंचित राहील्या.असा आरोप देखील रावराणे यांनी केला. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत आहे. याकडे कोणाच लक्ष नाही असा मुद्दा मंगेश लोके यांनी उपस्थित केला. तर तहसिलदार चिरीमिरी घेऊन या तोडीचे व्यवहार करीत आहेत असा आरोप अरविंद रावराणे यांनी केला.सभेच्या शेवटाला गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यांनी खाते प्रमुखांचे कान टोचले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here