तंत्रज्ञानाच्या माध्यमातून २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार : पंतप्रधान मोदी

0
80

गांधीनगर : इस्रायल शेती तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन या देशाने शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवला असून शेतीला उत्तम बनवले आहे. इस्रायलला शेतीतील अनेक पर्यायांची माहिती आहे. त्यांनी सिंचन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेतीत तंत्रज्ञानाचा वापर खूपच महत्वाचा आहे. २०२२ पर्यंत आम्ही भारतातही शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत गुजरातमधील वद्राद येथील सेंटर ऑफ एक्सलेंस येथे बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here