देशातील निम्म्या विद्यार्थ्यांना गणित जमेना…

0
89

नवीदिल्ली : ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट २०१७’ (असर) नुकताच प्रकाशित करण्यात आला. ‘असर’ने देशातील २४ राज्यांमध्ये प्रत्येकी दोन शहरांमध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात देशातील १४ ते १८ वयोगटातील २५ टक्के विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नसून निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना साधी आणि सोपी गणिते सोडविता येत नसल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. देशातील १४ ते १८ वयोगटातील २५ टक्के विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नसून निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना साधी आणि सोपी गणिते सोडविता येत नसल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. ३६ टक्के विद्यार्थ्यांना देशाची राजधानी माहिती नाही, तर २१ टक्के विद्यार्थ्यांना आपल्या राज्याचा आणि १४ टक्के विद्यार्थ्यांना देशाचा नकाशा माहिती नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे देशात शिक्षणाची हेळसांड सुरू असून अनेक विद्यार्थी शैक्षणिक माहिती, कौशल्य आणि भविष्यातील संधी यापासून दूर असल्याचे अधोरेखित होत आहे.‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट २०१७’ (असर) मंगळवारी प्रकाशित करण्यात आला. ‘असर’ने देशातील २४ राज्यांमध्ये प्रत्येकी दोन शहरांमध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणासाठी ३५ सामाजिक संस्थांच्या २ हजार स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली. देशातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यानुसार ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या अहवालनुसार १४ ते १८ वयोगटातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मातृभाषेतील वाक्ये वाचता येत नसल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here