नववर्षाच्या स्वागतासाठी मालवण पर्यटकांनी गेले बहरून

0
71

मालवण : गोव्याला जोडूनच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पर्यटकांची विशेष पसंती असलेली पहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मालवण पर्यटकांनी बहरून गेले आहे. देश विदेशातील पर्यटकांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल झाले आहेत. जलक्रीडा, रॉकगार्डनसह किल्ले सिंधुदुर्ग पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. दररोज हजारो पर्यटक किल्ले सिंधुदुर्ग येथे जातात. मात्र, दोन दिवस पर्यटकाना किल्ले सिंधुदुर्गचे लांबुनच दर्शन घ्यावे लागत आहेत. समुद्राला मोठी ओहोटी असल्यामुळे प्रवासी होड्या बंदरजेटी येथे लागत नाहीत. बंदरजेटी येथील गाळ कित्येक वर्षे काढलेला नाही. अमावस्या व पौर्णिमा या दरम्यानच्या काळात बंदर जेटीला प्रवासी बोट लावता येत नाही. शनिवारी, रविवारी दोन्ही दिवस दुपारी १ ते ४ या वेळेत होडी सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे पर्यटकाना किल्ले सिंधुदुर्गवर जाता आले नाही. त्यामुळे पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गचे दर्शन लांबूनच घ्यावे लागले. ऐन पर्यटन हंगामातच समुद्राच्या मोठ्या ओहोटीमुळे पर्यटकांचे नुकसान झालेच. शिवाय होडी व्यवसायिकांचेही नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here