निशिगंधा कुबल ठरल्या महापैठणीच्या मानकरी ; आदेश बांदेकरांसोबत महिलांनी केली धमाल

0
114

कणकवली : शिवसेना कणकवली शहर आयोजित महापैठणीच्या खेळात निशिगंधा कुबल महापैठणीच्या मानकरी ठरल्या. होममिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्यासोबत पैठणीचा खेळ खेळताना महिलांनी मनसोक्त धमाल केली. उपविजेत्या ठरल्या देविका दीपक गुरव आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या परिणिता कोठावळे ठरल्या. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी प्रदान करण्यात आली. शिवसेना कणकवली शहर आयोजित आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयेला…महापैठणीचा या खेळात मानाच्या पैठणीची मानकरी कोण होणार, याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली होती. नगरसेवक सुशांत नाईक यांच्या पुढाकाराने कणकवली शहर शिवसेनेने आयोजित केलेल्या महापैठणीच्या खेळात अखेर निशिगंधा कुबल यांनी बाजी मारत मानाची महापैठणी जिंकली. उपविजेत्या देविका दीपक गुरव आणि तृतीय विजेत्याचा मान परिणिता कोठावळे यांना मिळाला. आदेश बांदेकर यांच्या हस्ते विजेत्यांना मानाची पैठणी देण्यात आली. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तर प्रेक्षकांना मोफत लकी ड्रॉ च्या माध्यमातून चांदीची नाणी व अन्य भेटवस्तू देण्यात आल्या. सायंकाळी सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कणकवली विद्यामंदिर मैदानावर दुपारपासूनच महिलांनी गर्दी केली होती. ७ हजारहून अधिक महिला कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. गेली १४ वर्षे महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेले. लाडके भावोजी.. होममिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्यासोबत प्रत्यक्ष पैठणीचा खेळ खेळण्याची संधी मिळाल्यामुळे महिला प्रचंड खुश होत्या. आदेश बांदेकर यांनी आपल्या खुमासदार सुत्रसंचालनाने उपस्थित सर्व महिलांना बोलते करून कार्यक्रमात सहभागी करून घेतले. बांदेकर यांच्या आदरयुक्त थट्टामस्करीने महिला बेहद्द खुश झाल्या. केवळ युवती, नवविवाहिताच नव्हे तर सत्तर ऐंशीतील नऊवारी साडीतील वृद्ध आजीबाई सुद्धा फुगडी घालत, कोळी गीते आणि वाट माझी बघतोय रिक्षावाला अशा उडत्या गाण्यांच्या बोलावर स्टेजवर येऊन थिरकल्या हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here