पंतप्रधानाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा- राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

0
79

वैभववाडी : केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पारदर्शक विचार तळागळापर्यंत आपण पोहचविले पाहीजे.असे मत मंत्री रविद्र चव्हाण यांनी वैभववाडीत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरवात वैभववाडीतुन झाली. त्यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल वैभववाडी भाजपच्यावतीने सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्यानंतर मंत्री चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.आपल्या पक्षाकडे लोकांचा ओघ वाढतोय ही अभिमानाची बाब आहे. परंतु आपल सरकार राबवित असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यात आपण अपयशी पडतोय. हे दुर्भाग्य आहे. सरकारची प्रत्येक योजना समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहचणे गरजेचे आहे.ती पोहचविण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा कार्यकर्त्यांची आहे. जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपा करण्यासाठी सर्वांनी काम करा. असा सल्ला मंत्री चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांनी विविध विकास कामांची निवेदने मंत्री चव्हाण यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here