“पुण्यात सिंधुदुर्ग चषक २०१८” चा जोश आणि जल्लोष

0
102

पुणे : पुणे येथील सिंधुदुर्ग दशभुज मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग चषक क्रिकेट स्पर्धेचा जोश आणि जल्लोष नुकताच पार पडला. यावर्षीच्या सिंधुदुर्ग चषकावर पुणे – धानोरीच्या ओमसाई संघाने नाव कोरले. पुणे येथील सिंधुदुर्ग दशभुज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक सागर माळकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सिंधुदुर्ग चषक क्रिकेट स्पर्धा भरवली जाते. यावर्षी या स्पर्धेचे नववे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत पुणे, पिंपरी , चिंचवड येथील १६ संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघास आकर्षक चषक आणि रोख ८ हजार ८८८ रुपये, उपविजेत्या संघास आकर्षक चषक आणि रोख ४ हजार ४४४ बक्षीस ठेवण्यात आले होते. तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. नोकरी आणि व्यवसायानिमित्त कोकणातून पुणे येथे स्थायिक झालेल्या कोकणवासियांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग दशभुज मंडळाची स्थापना माजी नगरसेवक सागर माळकर यांनी केली होती. या मंडळाच्यावतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रम राबवून कोकणवासियांना एकाच व्यासपिठावर आणण्याचा प्रयत्न असतो. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी सिंधुदुर्ग चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सागर माळकर, मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, उपाध्यक्ष सुरेश लाड, सेक्रेटरी संतोष माळकर, खजिनदार जयवंत पास्ते, माजी अध्यक्ष सतीश पाटकर, भरत परब, रवींद्र दुखंडे, मोहन गवस, सीताराम गावडे, उद्योजक जी. के. सावंत, अजित पालकर, मोहन सावंत, सुनील परब, बाळा बांदेलकर, प्रवीण गावडे, राजू परब, जगन्नाथ सावंत, प्रमोद सावंत, क्रीडा समिती सदस्य अक्षय माळकर, रामा गावडे, अमर सावंत, यशवंत गावडे, वैभव राऊळ, दिनेश टीळवे, संदीप लाड, प्रकाश निकम, सुरेश पास्ते आदींनी ही स्पर्धा यशस्वी केली. अंतिम सामना पुणे – धानोरी येथील ओमसाई विरुद्ध पुणे – निगडी येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठान संघात झाला. हा सामना खूपच अटीतटीचा आणि खूपच रंगतदार झाला. अंतिम सामन्यात पुणे – धानोरीचा ओम साई संघ विजेता ठरला तर पुणे – निगडीचा सिद्धिविनायक प्रतिष्ठान संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट फलंदाज रुपेश कोरगावकर तर उत्कृष्ट गोलंदाज दर्शन राणे ठरला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २६ जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here