मच्छीमार खवळला… ‘स्वाभिमान’ दाखवला! ; निलेश राणेंची आरपार लढाई ‘फत्ते’

0
80

मालवण : जसा दर्या खवळतो तसा मालवणचा मच्छिमार स्वाभिमानच्या मोर्चाने खवळला. समुद्र नाही कोणाच्या बापाचा… आहे. आमच्या हक्काचा…एलईडी हटाव… मच्छिमार बचाव…च्या घोषणा देत हजारो मच्छिमार माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले. भरड नाका ते तहसील कार्यालयावर ‘ धडक ‘ मोर्चा काढून प्रशासनाला हादरवून सोडले. एलईडीचा वापर करून घुसखोरी करणारे परप्रांतीय मच्छीमार आणि या परप्रांतीय मच्छिमारांना पाठीशी घालणारं पोलीस प्रशासन यांच्या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणेंनी धडक मोर्चाचा एल्गार पुकारला होता. हा मोर्चा दडपण्यासाठी पोलीस प्रशासनाने मालवणात जमावबंदी आदेश लागू केला होता. त्यामुळे मोर्चा होणार की नाही याची उत्सुकता कोकणाला होती.  मात्र, पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता हजारो मच्छिमार मालवणच्या भरड नाक्यावर प्रशासनाच्या आणि परप्रांतीय मच्छीमारांच्या विरोधात जोरदार घोषणा देत मंगळवारी सकाळपासूनच एकवटायला सुरुवात झाली. ठीक ११ वाजता माजी खासदार निलेश राणे मोर्चात सहभागी झाले. समुद्र नाही कोणाच्या बापाचा… आहे आमच्या हक्काचा…एलईडी हटाव… मच्छिमार बचाव…अशा घोषणा देत भरड नाका ते बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावर माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मार्गस्थ झाला. भरड नाका ते तहसील कार्यालया पर्यँत कडेकोट पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मालवणला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.  तरीही मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. निलेश राणे एकंदरीत या धडक मोर्चाने पोलीस प्रशासन पुरते हादरून गेले. मोर्चामागच्या भावना तीव्र असल्या तरी आंदोलकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सांगता शांततेत केल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here