माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर भाजपात ; मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घेतले कमळ हाती

0
202

वैभववाडी : वैभववाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती व स्वाभीमानचे युवा नेते दिगंबर मांजरेकर यांनी भाजपात प्रवेश केला.राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आचिर्णे येथे कमळ हाती घेतले. मांजरेकर यांचा भाजपा प्रवेश हा स्वाभीमानसाठी धक्का आहे. वैभववाडीचे माजी उपसभापती व स्वाभीमानचे युवा नेते दिगंबर मांजरेकर भाजपावासी झाले. आचिर्णे येथे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थीतीत प्रवेश केला. मांजरेकर यांनी अडीज वर्ष पंचायत समितीच्या उपसभापतीपदाचा कारभार संभाळला होता. यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी कॉग्रेसकडून निवडणुक लढविली होती. मात्र स्वपक्षीयांनी दगाफटका केल्यामुळे ते पराभुत झाले. यानंतर ते राजकारणापासून काही दिवस अलिप्त राहीले. गेले वर्षभर ते पक्षात नाराज होते. त्यांच्या प्रवेशाची देखील चर्चा होती. अखेर त्यांनी भाजपचा कमळ हाती घेतला. यावेळी अतुल रावराणे, बंडु मुंडले, राजेंद्र राणे, संदेश सावंत, सज्जन रावराणे, जयदेव कदम, संतोष किंजवडेकर यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here