‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ चा तिसरा वर्धापन दिन २६ जानेवारीला होणार साजरा

0
38

सावंतवाडी : कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह चा तिसरा वर्धापन दिन २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनी साजरा होतोय. सावंतवाडी इथल्या ऐतिहासिक राजवाड्यात या निमित्ताने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या स्नेहमेळाव्याला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग लाइव्ह टीमने केले आहे. जगभरातल्या कोकणवासियांनी कोकणातली बातमी तातडीने मिळावी यासाठी काही युवा पत्रकारांनी एकत्र येवून सिंधुदुर्ग लाईव्ह या न्यूजचॅनेलची स्थापन केली. कोकणचं हे पहिलं २४ x ७ न्यूजचॅनेल ठरलं. आज बातमीची विश्वासार्हता आणि सत्यता केवळ आमच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहिली जाते. गेले तीन वर्ष कोकणातली कोणतीही बातमी पहिली येते ती सिंधुदुर्ग लाइव्हवर. स्थानिक केबल वाहिनीवर प्रक्षेपणाबरोबरच व्हॉटअॅप, फेसबुक, ट्वीटर, युट्यूब यावर अपडेट होत, सिंधुदुर्ग लाईव्हने जनमाणसात पहिले स्थान मिळविले. आजही मुंबईतला चाकरमानी आणि वृत्तवाहिन्या कोकणातील बातम्यांसाठी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या संपर्कात असतात. कोणतीही घटना घडल्यावर एकदम फास्ट ब्रेकिंग फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह देवू शकतो. त्यामुळे जोपर्यत आमच्याकडून बातमी जात नाही तोवर त्यावर खूप कमी विश्वास ठेवला जातो. बातम्यासोबतच सडेतोड चर्चा आणि निवडनुकीच्या काळात मतदारांच्या जागृतीसाठी खास प्रोग्रॅम घेणारे सिंधुदुर्ग लाईव्ह हे न्यूजचॅनेल आता कोकण वासियांचा जणू श्वास बनले. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे अनेकजण आज सिंधुदुर्ग लाईव्ह सोबत आहेत. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यासह मुंबई पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात आपला खास चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या सिंधुदुर्ग लाईव्ह या न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने कोकण माझा मी कोकणचा ही थीम ठेवण्यात आली आहे. याअंतर्गत कोकणच्या विकासासाठी ज्यांनी योगदान दिलंय त्यांच्याशी संवाद साधून कोकणवासियांना नवी प्रेरणा देणारी विशेष मुलाखतींची मालिका प्रसारित करण्यात येत आहे. या माध्यमातून कोकणच्या विकासाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न आहे. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्नेहमेळाव्याला सुरुवात होईल. सिंधुदुर्ग लाईव्ह ने घेतलेल्या, युवानेते संदीप गावडे प्रायोजित गणेश दर्शन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यावेळी होईल. त्यानंतर सर्वोत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार होईल. याचवेळी सिंधुदुर्ग लाईव्ह या न्यूज चॅनेलच्या नवीन लोगो आणि वेब पोर्टलचे लॉन्चींग होईल. या स्नेहमेळाव्यासाठी राज्यभरातून आणि कोकणातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग लाईव्ह टीमने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here