सुंदरवाडी महोत्सवाला शानदार प्रारंभ ; आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन

0
69
सावंतवाडी : माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुंदरवाडी महोत्सवाला शुक्रवारी सायंकाळी शानदार प्रारंभ झाला. सलग तिसऱ्या वर्षीच्या या महोत्सवाचं उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाल. गीत-संगीत, नृत्य आणि कॉमेडीची धमाल असलेल्या या महोत्सवाला रसिकांनी याही वर्षी तुडुंब गर्दी केली होती. महोत्सवाचे संयोजक संजू परब यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनाच यावेळी सर्वांनी कौतुक केलं. कोकणामध्ये पर्यटकांना आकर्षित करायचे असेल तर, विविध प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव आणि सेलिब्रेटी यांना वारंवार आणण्याची गरज आहे. याच भूमिकेतून माजी खासदार निलेश राणे यांनी सुंदरवाडी महोत्सवाची संकल्पना मांडली. त्यानंतर लगेचच युवा नेते संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ती प्रत्यक्षात आणली. आज सलग तिसऱ्या वर्षी या सुंदरवाडी महोत्सवाचे आयोजन होतंय. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचं शानदार उदघाटन झाल. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अतिशय देखण्या संयोजनाच मान्यवरांनी कौतुक केलं. त्यानंतर सुरु झाला तो गीत – संगीत, नृत्य आणि कॉमेडीचा जल्लोष. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here