१५ मार्चला सिनेमागृह प्रेक्षकांसाठी खुले करणार-आमदार नितेश राणे

0
195

देवगड :आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडात साकारत असलेल्या कंटेनर चित्रपटगृहाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील हे पहिले कंटेनर बॉक्स चित्रपटगृह असणार आहे. येत्या १५ मार्चला सिनेमागृह प्रेक्षकांना खुले होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी देवगड जामसंडे निवडणूक कालावधीत दिलेली आश्वासनाची वचनपूर्ती केली असून देवगडमधील तिसरा चित्रपटगृहाचा प्रकल्प मार्च १५ पर्यत कार्यान्वित होणार असून ११० आसनक्षमता असणारे देशातील पहिले कंटेनरबॉक्स चित्रपट गृह असणार आहे. याचे भूमिपूजन मंगळवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. तसेच नामफलकाचे अनावरणही आमदार नितेश राणें यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष  योगेश चांदोस्कर, तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉ अमोल तेली, माजी सभापती रवींद्र जोगल,जि प सदस्या सौ. सावी लोके आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here